सासुरवाडीची शाखा सांभाळायला पाहिजे होती, मनसेचा खोचक टोला

 

सध्या खरी शिवसेना कुणाची यावरून ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये रस्त्यावरही वाद सुरू आहेत. डोंबिवलीमध्ये शिवसेना शाखेवरून ठाकरे-शिंदे गटामध्ये जोरदार राडा झाला. दोन्ही गटांमधला वाद चिघळण्याआधीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अशातच एकनाथ शिंदे यांच्या गटाने डोंबिवलीच्या शिवसेना शाखेवर अधिकृत ताबा घेतला.

डोबिंवलीमध्ये शिंदे गटाचे वचर्स्व असल्याने मोठ्या संख्येने शिंदे समर्थक डोंबिवली शिवसेना शहर शाखेत आले होते. ठाकरे गटातील पदाधिकारी शिल्पा मोरे या डोंबिवली शहर शाखेवर येताच शिंदे समर्थक महिलांनी त्यांना हुसकावून लावले. यामुळे काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.

दरम्यान, मनसेने शिवसेना शाखेच्या वादावरून उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांच्या सासुरवाडीची शाखा होती, ती त्यांनी सांभाळायला पाहिजे होती. मी त्यावर जास्त बोलणार नाही कारण तो त्यांच्या दोन पक्षातील विषय आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.

Team Global News Marathi: