सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण.

नागपूर : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या चिंतेत अधिक भर घालणारी आहे. एकीकडे लसीकरण युद्ध पातळीवर सुरु असताना दुसरीकडे सामान्य नागरिकांसोबत अनेक राजकीय पुढारी, सेलिब्रिटी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना कोरोनाची लागण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

त्यात आता राष्ट्रीय स्वयंसेवी संघाचे संघचालक मोहन भागवत यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. संघाने शुक्रवारी रात्री उशिरा ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मोहन भागवत यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहेत. त्यांच्यामध्ये काही हलकी लक्षणं असल्याने त्यांना नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. असे ट्विट त्यांनी केले आहे.

मागच्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा एकदा झपाट्याने हातपाय पसरायला सुरवात केली आहे. मागच्या चोवीस तासात देशात १ लाख ३० हजार हून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यातही महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार अधिक झपाट्याने होतं असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Team Global News Marathi: