‘सारखा विरोध झाला तर शिवाजी महाराजांवर कुणीच चित्रपट काढणार नाही’

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या कोकण दौऱ्यात माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य करत थेट राज्याच्या राजकारणावर चिंता व्यक्त केली आहे कोणीही उठावं आणि इतिहासावर बोलावं असं होऊ नये, जे इतिहास तज्ज्ञ आहेत त्यांनी कागद तपासावीत. माझं म्हणणं आहे की जो कुणी लेखक जो कुणी चित्रपट तयार करतोय एकदा त्यांच्याशी तुम्ही बोला तर. की तुम्ही जे चित्रपट करता त्यात कसलं संशोधन तुम्ही केलं आहे. हे संदर्भ कुठून घेतले आहेत. मुळात ही पहिली गोष्ट केली पाहिजे की नाही?

“असल्या कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत आणि विरोध करायचा याला काय अर्थ आहे? उद्या लोक म्हणतील शिवाजी महाराजांवरील चित्रपटच करणे नको, इतिहासावरील चित्रपट दाखवायलाच नको. कुणीही उठतंय आणि इतिहासाबद्दल बोलायला लागलं आहे. आपल्याला त्याबद्दल माहिती नसेल तर, आपल्याला गंध नसेल, वाचन नसेल, जे इतिहासतज्ज्ञ बसलेले आहेत, ज्यांनी आपली हयात घालवली, एकदा विचारा त्यांना.”

रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “जर चित्रपटावर काही हरकत असेल तर त्या निर्मात्या, लेखकाशी संवाद साधायला हवा आणि त्यांची बाजू समजून घ्यायला हवी,” असंही ते म्हणाले.

Team Global News Marathi: