संत बाळूमामाच्या भाकणुकीत नेमकं काय म्हटलं? राजकारणात होणार उलथपालात

कोल्हापूर | कोल्हापूर – आदमापूर येथील संत बाळूमामा भाकणुकीचा सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. मराठी वर्षाचा शेवटची भाकणूक असल्यानं अनेकांचे लक्ष आगामी भविष्यात नेमक्या काय घडामोडी घडतील याकडे लक्ष लागलं होते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी सरकार असल्याने या तिन्ही पक्षात किती काळ समन्वय राहील हे सांगणे कठीण आहे.

त्यातच विरोधी पक्ष भाजपा सातत्याने सरकार पडणार असल्याची तारीख देत असतो परंतु अडीच वर्ष सरकारला काहीही झाले नाही. मात्र या काळात सरकारचे २ मंत्री कोठडीत गेले आहेत. त्यामुळे सरकारवरील टांगती तलवार कायम आहे. त्यात बाळूमामाच्या भाकणुकीत देशाच्या राजकारणाच्या संदर्भात भविष्यवाणी करण्यात आली आहे. राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकारणी मंडळी मोठ्या प्रमाणात पक्षांतर करतील अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे.

इतकेच नाही तर राजकारणी मंडळी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील. काँग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण राहील. कमळाचा झेंडा मिरवेल आणि काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण पसरेल. देवा धर्माला विसरून लोकं राजकारणात जातील. पैसा न खाणारा सापडणार नाही. भ्रष्टाचार फोफावेल. नेतेमंडळी तुरुंगात जातील. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे.

Team Global News Marathi: