संजय राऊतांना दिलासा नाहीच, १७ ऑक्टोबर पर्यंत कोठडीत वाढ

मुंबई पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना पुन्हा दिलासा नाहीच. मुंबई सत्र न्यायालयाकडून राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले; परंतु पुन्हा एकदा त्यांच्या कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

तसेच १७ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे राऊतांचा मुक्काम आता १७ ऑक्टोबरपर्यंत कोठडीतच असणार आहे. आजच्या सुनावणीमध्ये ईडीने नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार चार प्रकारांत जामीन अर्जाची विभागणी करण्यात आली होती. ईडीच्या म्हणण्यानुसार या संपूर्ण गैरव्यवहारात संजय राऊत यांचा पडद्यामागून हात आहे.

म्हाडा आणि इतर प्रशासकीय बैठकांसाठी संजय राऊत यांनी त्यांच्या राजकीय हेतूने मदत केल्याचेही तपासात समोर आले होते. गुरू आशिष कंपनीत प्रवीण राऊत यांच्यासोबतचे त्याचे आर्थिक व्यवहार तर प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या बँक खात्यातूनही वर्षा राऊत यांना पैसे पाठवण्यात आले असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे दोघांमध्ये झालेल्या व्यवहारातील १ कोटी ६ लाख या पैशांचा हिशेब लागत नाही, अशी माहिती ईडीकडून कोर्टात देण्यात आली.

Team Global News Marathi: