संजय राऊतांच्या त्या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळेंची सावध प्रतिक्रिया

 

संजय राऊत यांच्या प्रश्नावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अप्रत्यक्षपणे सावध भूमिका घेतली आहे.राष्ट्रीय प्रवक्त्यांची भूमिका ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. यावर स्पष्टपणे बोलणं मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी टाळलं आहे. कधीकधी बोलण्याचा भाव वेगळा असतो, मात्र बोलताना ध चा म होतो, मात्र दृष्टिकोन वेगळा असतो, असं स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिलं आहे.

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी विधान केलं होतं, की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली होती. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकारण तापताना दिसत आहे. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची भूमिका ही भाजपची अधिकृत भूमिका आहे? का असा प्रश्न ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.

यावर भाजप प्रशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देत इतिहासामध्ये असे अनेक दाखले आहेत त्या दाखल्यांच्या आधारावर हे वादंग उठत आहेत. मात्र स्वातंत्र्यवीरांना इतिहासात विरोधकाला चकवा देणे अथवा चूक झाली म्हणून माफी मागून घेणे असा गमिनी कावा करावा लागत होता, असं म्हटलं आहे.. पुढे ते म्हणाले, ‘मात्र त्या मागची भावना काय असते हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीरांबद्दल इतिहासाला घेऊन त्यांच्या गामिनी काव्याला धरून तुम्ही प्रश्नचिन्ह उभे करू शकत नाही.

कधीकधी बोलण्याचा भाव वेगळा असतो मात्र कधीकधी बोलण्याचा भाव वेगळा असतो. बोलताना ध चा म होतो. मात्र दृष्टिकोन वेगळा असतो. ही गल्लत झाली असेल, अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या भूमिकेबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी अप्रत्यक्षपणे सावध भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळाले.

Team Global News Marathi: