संजय राऊतांच्या टिकेवर मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार, म्हणाले की,

 

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाने अचानक माघार घेतल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांना मोठे बळ मिळाले. भाजपाच्या मुरजी पटेल यांनी माघार घेतली असली तरी लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात असल्याने ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होईल. आता. भाजपच्या माघारीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टिकेलाही प्रत्युत्तर दिलंय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपाने माघार घ्यावी, असे आवाहन केले होते. त्यानंतर सोमवारी भाजपाने उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्राची परंपरा कायम राखण्याचं काम भाजपाने केलं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मात्र, पत्रकारांनी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टिकेसंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावरही, त्यांनी एका वाक्यात पलटवार केला. “मुंबई महानगरपालिकेची निवडणूकही जवळच आली आहे, तेव्हा कोण हरतो आणि कोण जिंकतो ते कळेल.

Team Global News Marathi: