संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत शिंदे गटाची टीका ; म्हणाले की,

 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. या वादावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. सीमाप्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भूमिका मांडत नसल्याची टीका विरोधकांनी केली होती. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सीमावादावर काहीच बोलत नाहीत. ते शेपूट घालून बसले.” असे म्हटले होते. त्यावर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले. “जे गाढव, नालायक असतात, ते वायफळ बडबड करतात. त्याची आम्ही दखल घेत नाही.” असे म्हणत त्यांनी राऊतांवर एकेरी शब्दांत टीका केली.

“एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यात एवढा मोठा उठाव केला. त्याची दखल संपूर्ण जगाने घेतली. तेव्हा आम्हाला फिरू देणार नाही, अशा धमक्या मिळाल्या. पण तेव्हाही आम्ही शेपूट घातले नाही. सर्वत्र वाघासारखे फिरलो. आताही वाघासारखे फिरतो. मुख्यमंत्र्यांनी काय करावे, हे सांगण्यासाठी दीड शहाण्याची गरज नाही. हा दीड शहाणा माणूस केव्हाही उठेल, काहीही भुंकेल, याला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री बांधील नाहीत.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाची सीमावादाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कोणतेही प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सुज्ञ माणसांनी त्यावर बोलायचे नसते. पण जे गाढव नालायक असतात, ते वायफळ बडबड करतात. त्याची आम्ही दखल घेत नाही. राहिला प्रश्न शेपूट घालायचा, तर १०० दिवस तुरुंगात राहून संजय राऊत बाहेर आल्यानंतर, मी मोदींना भेटणार, मी फडणवीसांना भेटणार, असे म्हणत होते. खरं तर, शेपूट तेच घालत होते. आता पंधरा दिवसांत त्यांची वळवळ परत सुरू झाली आहे. तेव्हा शेपूट घालून त्यांनी सरेंडर केले होते. आता एवढी मस्ती का आली?” असे म्हणत त्यांनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला.

Team Global News Marathi: