संजय राऊत म्हणजे शकुनीमामा; ठाकरेंच्या पाठोपाठ पवारांनाही अडचणीत आणले

 

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर शेलक्या भाषेत टिका करतांना त्यांना शकुनीमामा म्हटले आहे. काल खासदार शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होणार असल्याचे सांगताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या सर्व प्रकरणात राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहास देखील उधाण आल्याचे दिसून येत आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य करतांना खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे.

राणे म्हणाले की, संजय राऊत यांच्यामुळे ठाकरे कुटुंबात अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता हाच प्रकार पवार कुटुंबातही होत असून यासाठी राऊतच जबाबदार आहेत. राऊत हा माणूस घरात घेऊन जाण्याच्या लायकीचा नाही. याच माणसाने मोहित कंबोज यांच्या हॉटेलचे प्रकरण नाहक उकरून काढले. यामुळे कंबोज हे आदित्य वा तेजस ठाकरे यांच्या हॉटेल लाईफ बाबत बोलतील हे त्याला माहित होते. ठाकरे कुटुंब अडचणीत यावे याचसाठी त्याने हा प्रकार केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी याप्रसंगी केला.

तसेच काँग्रेसच्या अंतर्गद वादावर भाष्य करणाऱ्या राऊतांना नाना पाटोले यांनी सुद्धा झापलं आहे. संजय राऊत हे काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत. त्यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल बोलून चोमडेगिरी करू नये, असा टोला नाना पटोले यांनी राऊतांना लगावला आहे.अजित पवार यांच्यानंतर आता नाना पटोले यांनी देखील संजय राऊत यांना फटकाऱ्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होतीये का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान पटोले यांच्या टीकेला आता संजय राऊत काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Team Global News Marathi: