Monday, September 25, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संजय राऊत ही ॲक्शन मोडमध्ये , खासदार भावना गवळींची प्रतोद पदावरून उचलबांगडी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
July 6, 2022
in राजकारण
0
संजय राऊत ही ॲक्शन मोडमध्ये , खासदार भावना गवळींची प्रतोद पदावरून उचलबांगडी

संजय राऊत ही ॲक्शन मोडमध्ये , खासदार भावना गवळींची प्रतोद पदावरून उचलबांगडी ;यांच्यावर सोपवली जबाबदारी

महाराष्ट्रातील सत्तापालटापूर्वी महाविकास आघाडीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला टक्कर देण्याची रणनीती आखली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडासाठी भाजपकडून पुरवण्यात आलेली रसद पाहता शिवसेनेची भूमिका कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, आता राहुल शेवाळे यांनी पक्षाविरोधात जाणारा विचार बोलून दाखवला आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदारही फुटतील, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.

 

हायलाइट्स:

भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले होते

शिवसेनेचे १२ खासदार फुटणार असल्याची चर्चा सातत्याने रंगली आहे

शिवसेनेने भावना गवळी यांना लोकसभेतील प्रतोद पदावरून दूर केले आहे

मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील विधिमंडळात धक्का बसल्यानंतर आता शिवसेनेकडून संसदीय राजकारणाच्यादृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी (Bhavana Gawali) यांची उचलबांगडी केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहले होते. यामध्ये भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार फुटणार असल्याची चर्चा सातत्याने रंगली आहे. यामध्ये भावना गवळी यांचे नाव आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भावना गवळी यांना लोकसभेतील प्रतोद पदावरून दूर केले आहे. भावना गवळी यांच्या जागी ठाण्यातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्र लिहून माहिती दिली आहे. या पत्रात भावना गवळी यांच्या जागी शिवसेनेचे लोकसभेतील मुख्य प्रतोद म्हणून खासदार राजन विचारे यांची तात्काळ प्रभावाने निवड झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता यावर भावना गवळी काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

आता भावना गवळीही शिवसेनेची साथ सोडून बाहेर पडणार का, हे पाहावे लागेल. कालच मुंबईतील शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनीही उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. त्यामध्ये भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती राहुल शेवाळे यांनी केली होती.

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: खासदार भावना गवळीलोकसभासंजय राऊत
ADVERTISEMENT
Next Post
भावना गवळी यांना धक्का, लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद पदावरून हटवले

भावना गवळी यांना धक्का, लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद पदावरून हटवले

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group