संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी -भाजपा
सिने अभिनेता सुशान्त सिह राजपूत प्रकरणी राजचे नाही तर देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष, सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालयावर निशाणा साधला होता.

आता सामना’च्या टिकेनतंर भाजपाने जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. भाजपचे प्रवक्ता निखिल आनंद यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे घेल्यामुळे महाराष्ट्र सरकार का घाबरतंय? असा सवाल त्यांनी उपस्थित करत राऊतांना टोला हाणला आहे. तसेच, या प्रकरणात संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची नार्को चाचणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
शिवसेना सीबीआय तपासामुळं घाबरलेली आहे. जर शिवसेनेच्या नेत्यांना सगळं काही माहिती आहे तर संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची सीबीआयने नार्को चाचणी करावी म्हणजे या प्रकरणातील धागे-दोरे समोर येतील. आदित्य ठाकरेंनी घाबरुन स्पष्टीकरण दिले आहे, मग राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही आता या प्रकरणावर मौन सोडावे, असे म्हणत निखिल आनंद यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला डिवचण्याचा काम केले आहे.