सामनाच्या अग्रलेखाचं कात्रण जपून ठेवलं, संजय राऊतांना पुन्हा तुरुंगात जाण्यासाठी….. नारायण राणे यांचे सूचक विधान

 

मुंबई | २६ डिसेंबरच्या सामनाच्या अग्रलेखाचं कात्रण जपून ठेवलं आहे. संजय राऊत याला पुन्हा जेलचा रस्ता दाखवणार. 100 दिवस जेलमध्ये जाऊन बाहेर आलाय ना. त्याला पुन्हा जेलवारी घडवणार,” असा इशारा केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांनी सिंधुदुर्गातील कणकवलीमधील एका कार्यक्रम दरम्यान दिला आहे. कणकवली पर्यटन महोत्सव 2023 मध्ये नारायण राणे बोलत होते.

राणे म्हणाले की, “माझ्याकडे कात्रण आहे, मी वकिलाकडे पाठवून ठेवलंय. मी असं वाचून विसरणारा नाही, दखल घेणारा आहे. वाईट स्वभाव आहे माझा. 26 डिसेंबरच्या सामनाच्या अग्रलेखाचं कात्रण जपून ठेवलं आहे. संजय राऊतला सोडणार नाही. ती त्याच्यावर केस करणार आहे. 100 दिवस कमी वाटले म्हणून त्याला वाटलं परत जावं. म्हणून रस्ता मोकळा करतोय परत जायला,” असं नारायण राणे म्हणाले.

ठग-पेंढाऱ्यांचे राज्य! या मथळ्याखाली 26 डिसेंबरचा अग्रलेख प्रकाशित झाला होता. यात नारायण राणेंचा उल्लेख न करता म्हटलं होतं की, “सिंधुदुर्गात रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणेंचा खून पचवणारे दुसऱ्यांकडे बोट दाखवतात. या तिन्ही खुनांच्या तपासासाठी श्री. फडणवीस एखादी एसआयटी नेमणार असतील तर कोकणातले 100 सांगाडे पुरावे म्हणून त्या एसआयटीसमोर स्वत:च हजर होती. पण श्रीमान फडणवीस ते करणार नाहीत. ढेकणासंगे हिराही भंगला अशी त्यांची गत झालेली दिसते असं सामना अग्रलेखात छापण्यात आला होत.

Team Global News Marathi: