सामनाच्या टीकेला आशिष शेलार यांचं प्रतिउत्तर

 

आजच्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. कानडी मुख्यमंत्री सीमाभागासाठी लढतात, महाराष्ट्रांच्या गावांवरही दावा ठोकतात. इथे महाराष्ट्र सरकारचे शेलारमामा नेभळटासारखे फक्त अरे ला कारे बोलत आहेत, असा हल्ला अग्रलेखातून करण्यात आला होता. सामनातील ही टीका आशिष शेलार यांना चांगलीच झोंबली आहे. शेलार यांनी एक पत्रक काढून शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला आहे. राष्ट्रवादीसोबतचा संसार सर्वात मोठा नेभळटपणा नव्हता काय? असा सवाल करतानाच शिवसेनेच्या आजवरच्या नेभळटपणावर बोट ठेवत वा रे मर्दा, असा खोचक टोलाच शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे.

विरोधी पक्षाने नरसिंह होऊन खोके सरकारचा अंत करायला हवा, अशी “मर्दानी” हाक आज सामनाच्या अग्रलेखातून दिली आणि “कर्नाटकने आरे केले तर आम्ही कारे करु” हा महाराष्ट्राने दिलेला इशारा यांनी नेभळट ठरवला… वा रे मर्दा..!

मुळात विरोधी पक्षाने नरसिंह अवतार धारण करण्यासाठी, या अवताराला बोलावण्यासाठी एका “प्रामाणिक” भक्त प्रल्हादाची गरज असते ना हो कार्यकारी संपादक महोदय…! तुमच्याकडे नारायण..नारायण जप करणारा भक्त प्रल्हाद आहे का? तुमच्याकडे आता भक्तप्रल्हाद ही नाही, नारायण ही नाही. आणि हो, तुमच्यात आता रामच उरलेला नाही. आठवते का? कधी काळी राम मंदिर आणि राम वर्गणीची खिल्ली उडवली होतीस ना रे मर्दा? आता भक्तप्रल्हाद होऊ पाहताय? वा रे मर्दा!

कर्नाटकला महाराष्ट्र जशास तसे उत्तर देईल… आरेला कारे करेल… हा इशारा तुम्हाला नेभळट वाटतो काय? मग राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकररांना समलैंगिक म्हणते तेव्हा तुम्ही करता तो काय? मर्दानी बाणा असतो काय? वा रे मर्दा वा!

तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वशंजाकडे पुरावे मागता, तो काय तुमचा मर्दपणा होता का? प्रभू राम झालाच नाही… भगवत गीता जिहाद शिकवते असे महान जावई शोध लावणाऱ्या काँग्रेस सोबत इलूइलू जे तुमचे सुरु आहे, ती मर्दानगी आहे का? अहो महाराष्ट्रातील श्रध्दा वालकर नावाच्या लेकीचे 35 तुकडे केले जातात तेव्हा जो पक्ष साधी हळहळ सुध्दा व्यक्त करीत नाही ना, त्याला नेभळटपणा म्हणतात…

Team Global News Marathi: