सामंतांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा निशाणा

 

पुणे : शिंदे गटात सामील झालेले माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यातील कात्रज येथे हल्ला झाला. उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या हल्ल्यांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत यांच्यावर झालेला हा हल्ला भ्याड हल्ला झाला आहे. ही काही मर्दानगी नाही. असे कृत्य करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतीलच. पण मला राज्यात शांतता हवी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘ उदय सामंत यांच्या गाडीवर झालेला हा हल्ला भ्याड भ्याड हल्ला आहे. ही काही मर्दनगी नाही. जर कोणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असेल तर पोलीस कारवाई करत आहेत. कोणी आततायीपणा करत असेल तर पोलीस कारवाई करतीलच.’

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गुन्हा झाल्यावर पोलिसांना कारवाई करा म्हणून सांगवे लागत नाही. जे कोणी चिथावणीखोर भाषण करत असेल तर पोलीस कारवाई करतीलच. कोणी असे वक्तव्य केले असेल तर पोलीस तपासून त्यांच्या विरोधात कारवाई करतील. कायदा आणि सुव्यवस्था पोलीस पाहतील. प्रक्षोभक भाषण कोणी करत असेल तर पोलीस कारवाई करतील. मला राज्यात शांतता हवी आहे.

प्रकरण असे की, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांची सभा पुण्यातील कात्रज भागात सुरू होती. सभा संपल्यानंतर ते सभास्थळावरून निघाले. त्याच वेळी उदय सामंत यांची गाडी आदित्य जेथून निघाले त्या कात्रज चौकात आली. यावेळी उपस्थित जमाव आक्रमक झाला. त्यांनी सामंत यांच्या गाडीवर दगडफेक आणि चप्पलफेक केली आणि ‘गद्दार गद्दार’ अशा घोषणा दिल्या. यावेळी जमाव उदय सामंत त्यांच्या गाडीवर वर चालून गेला. त्यामुळे मोठा गोंधळ आणि तणाव निर्माण झाला.

Team Global News Marathi: