समीर वानखेडेंचा नवा फोटो ट्विट करत नवाब मलिकांनी दिला सूचक इशारा

 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप लगावले जात आहेत. नवाब मलिक यांनी सकाळीच ट्विट्स करत समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे. नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या लग्नाचा फोटो ट्विट करत सूचक इशारा दिला आहे. हा फोटो ट्विट करत नवाब मलिकांनी म्हटलं, “स्वीट कपलचा फोटो – समीर दाऊद वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी.”

या पत्रकार परिषदेत आता नवाब मलिक कुठला गौप्यस्फोट करतात हे पहावं लागणार आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिक यांच्याकडून वारंवार एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्या विरोधात वेगवेगळे आरोप करुन गौप्यस्फोट करत असल्याचं पहायला मिळत आहे. पंच प्रभाकर साईल चौकशीच्या फेऱ्यात मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात पंच असलेले प्रभाकर साईल हे आता चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. एनसीबी अधिकाऱ्यांकडून आर्यन खान प्रकरणात पैसे उकळण्याचा गंभीर आरोप प्रभाकर साईल नेकेला होता.

त्यानंतर प्रभाकर साईल यांची चौकशी सुरू झाली आहे. प्रभाकर साईल यांच्या चौकशीसाठी एनसीबीचं पथक दिल्लीहून मुंबईला येणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी प्रभाकर साईल याला चौकशीसाठी उपस्थित राहण्याच्या संदर्भात सम्न्सही पाठवण्यात आलं आहे. प्रभाकर साईलनं काय केलेत आरोप प्रभाकर साईल यांनी NCB च्या एका बड्या अधिकाऱ्यावर आणि इतर साक्षीदार केपी गोसावी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत.

Team Global News Marathi: