समीर वानखेडे प्रकरणी नवाब मलिक यांची जाहीर भूमिका अन् खुलं आव्हान

 

मुंबई | ड्रग्स प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यात चांगलेच शीतयुद्ध पेटललेल दिसून येत आहे. त्यातच नववबा मलिक हे वानखडे यांच्या प्रकरणात धक्कादायक खुलासे करून वानखडेच्या अडचणी वाढवण्याचे काम करताना दिसून येत आहे. मी केलेले सगळे आरोप जर खोटे असतील तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, अशी रोखठोक भूमिका नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे.

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे बडे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेले अनेक दिवस दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक वानखेडेंविरोधात अनेक दावे ते करत आहेत. मलिकांच्या आरोपांना काल समीर यांच्या पत्नी क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. तसंच आम्ही हिंदूच आहोत हे देखील तिने ठासून सांगितलं.

मात्र दुसरीकडे मलिक आपल्या दाव्यावर ठाम आहेत. वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा निघाल्यास मंत्रिपद सोडेन, असं आव्हानच त्यांनी दिलं आहे. मी आतापर्यंत समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांवर ठाम आहे. वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा ठरल्यास मंत्रिपद सोडायला तयार आहे. मी केलेले आरोप खोटे ठरवून दाखवा, असं आव्हानच मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांना दिले आहे.

Team Global News Marathi: