संभाजी राजेंनी पक्षप्रवेश नाकारल्यास शिवसेनेचा प्लान बी तयार, आता कोणाला मिळणार उमेदवारी ?

 

छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेचं पक्ष प्रवेशाचं निमंत्रण स्वीकारलं नाही, तर शिवसेनेचा प्लान बी तयार असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती समोर आली आहे.शिवसेनेच्या प्लान बीनुसार ग्रामीण महाराष्ट्रातील चार कट्टर शिवसैनिकांचे उमेदवारी अर्ज तयार असल्याची माहिती समोर आली आहे. आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीराजे यांची ट्रायडंट हाॅटेलमध्ये भेट घेऊन त्यांना आज शिवसेना पक्ष प्रवेशाचं निमंत्रण दिलं आहे.

शिवसेनेच्या निमंत्रणाला संभाजीराजे छत्रपती काय प्रतिसाद देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी उद्या शिवसेनेत पक्ष प्रवेश नाही केला तर शिवसेनेच्या प्लान बी प्रमाणे कट्टर शिवसैनिकाला उमेदारी जाहीर करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या प्लान बी प्रमाणे ग्रामीण महाराष्ट्रातील चार कट्टर शिवसैनिकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्र तयार असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे.

शिवसेनेच्या प्लान बी नुसार शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ग्रामीण महाराष्ट्रातील चार पैकी एका कट्टर शिवसैनिकाची राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करणार असल्याचं समजते. संभाजी राजेंनी वर्षावर जाण्याचं निमंत्रण स्वीकारलं असलं तरी ते उद्धव ठाकरेंची ऑफर स्वीकारणार की नाही, याबाबत कोणतीही माहिती कळू शकलेली नाही.

Team Global News Marathi: