संभाजीराजे भोसले राज्यपालांवर संतापले, म्हणाले…

 

पुणे येथे आज राज्यपाल यांचा दौरा होता, त्याच दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध नोंदविण्याचा प्रयत्न केला होता. अशातच भारतीय जनता पक्ष नेते आणि शिवाजी महाराजांचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यानंतर आता संभाजीराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे.

राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक ! आणि देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा ! हा कोणता न्याय ?, ‘स्वराज्य’चे प्रवक्ते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथे भगतसिंग कोश्यारीला काळे झेंडे दाखवले, असं ट्विट संभाजीराजे भोसले यांनी केलं आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत या कारवाईचा एकप्रकारे निषेध व्यक्त करत अनेक सवाल उपस्थित करत राज्यपाल यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच राज्यपाल यांना मोदी सरकार पदमुक्त करतात का ? की राज्यपाल माफी मागतात ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Team Global News Marathi: