संभाजीनगर नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी साधला फडणवीसांवर निशाणा

 

– १९८८ पासून औरंगाबादला आम्ही संभाजीनगर म्हणतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. मी सगळीकडे संभाजीनगर बोलतो. २ वर्ष कायदेशीर तयारी केली आहे. आम्ही दोन अडीच वर्ष काम करतोय. उद्धव ठाकरे रिकामे बसले नाहीत. केंद्रांत आणि राज्यात भाजपाची सत्ता असून संभाजीनगर केले नाही हा त्यांचा दोष आहे असा आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

चंद्रकांत खैरे म्हणाले की, ज्या ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस औरंगाबादमध्ये आले तेव्हा त्यांना भगवी शाल द्यायचो. संभाजीनगरबाबत विचारणा केली तर होऊन जाईल इतकं गोड बोलून सांगायचे. पण एकदाही त्यांनी ते केले नाही. मग बहिरे कोण?, आम्ही १९८८ पासून संभाजीनगर म्हणतो. टाळ्या वाजवण्यासाठी उगाच टीका करू नये. मी शिवसेनेचा ज्येष्ठ नेता आहे. बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे कायदेशीर रित्या संभाजीनगर करण्यासाठी तयारी करत आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच औवेसी ही भाजपाची बी टीम आहे. वंचित आघाडीला भाजपाने पाठिंबा दिला होता. तुम्ही आमच्यावर टीका करू नका. देवेंद्र फडणवीस ५ वर्ष मुख्यमंत्री असताना संभाजीनगर करावं असा ठराव पास केला होता. त्यांनी भाषणात खोटं बोलू नये. ५ वर्ष का हालचाल केली नाही. भाजपावालेच खोटे बोलतात. मला बहिरे करायला तुम्ही डॉक्टर आहात का? असा सवाल चंद्रकांत खैरेंनी केला आहे.

Team Global News Marathi: