सलमानला वाढदिवशी शुभेच्छा द्यायला मध्यरात्रीच पोहचला शाहरुख खान

 

अभिनेता सलमान खान याचा आज 27 डिसेंबर 2022 रोजी 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमान खानचा इंडस्ट्रीत एक वेगळाच दरारा असून त्याला बॉलिवूडचा ‘गॉडफादर’ देखील म्हटले जाते. ‘भाईजान’ने आज त्याच्या वाढदिवसाची सुरुवात एका ग्रँड पार्टीने केली ज्यामध्ये इंडस्ट्रीतील टॉप स्टार्स त्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहचले होते. पण या सर्व स्टार्समध्ये एका व्यक्तीने खास लक्ष वेधले. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आहे. सलमानचा जवळचा मित्र सुपरस्टार शाहरुख खान सलमानला वाढदिवशी शुभेच्छा द्यायला मध्यरात्रीच पोहचला.

या दोघांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. बॉलीवूडचा ‘अर्जुन’ अर्थात शाहरूख खान ‘करण अर्जुन’ चित्रपटाच्या ‘करण’ला म्हणजेच सलमान खानला त्याच्या 57 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला. सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीत पोहोचणारा शाहरुख शेवटचा स्टार होता. ब्लॅक लेदर जॅकेट परिधान करून अभिनेता सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीला अतिशय मस्त स्टाईलमध्ये उपस्थित होता.

शाहरुख खानच्या एंट्रीचा जास्त गाजावाजा होत आहे. खरं तर, सलमानला भेटल्यानंतर, जेव्हा शाहरुख त्याच्या बर्थडे पार्टीमधून निघू लागला तेव्हा ‘बर्थडे बॉय’ सलमान स्वत: त्याला कारपर्यंत बाहेर सोडण्यासाठी आला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शाहरुख आणि सलमान बाहेर काहीतरी बोलत आहेत आणि नंतर कारमध्ये बसण्यापूर्वी शाहरुख सलमानला मिठी मारतो. असे केल्यावर सलमाननेही शाहरुखला घट्ट मिठी मारली.

 

Team Global News Marathi: