सायना नेहवाल विरोधात आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या सिद्धार्थ विरोधात तक्रार दाखल

 

प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थने बॅडमिंटन स्टार सायना नेहवालवर आक्षेपार्ह कमेंट केली होती. या कमेंट नंतर नेत्याकर्यांनी जोरदार टीका त्यांच्यावर केली होती. तसेच अभिनेता सिद्धार्थने सायना नेहवालची माफी मागितली होती. पण ताज्या वृत्तानुसार, हैदराबाद सायबर क्राइम पोलिसांनी ही वादग्रस्त कमेंट केल्यानंतर अभिनेता सिद्धार्थविरोधात तक्रार दाखल केली आहे.

हैदराबाद सायबर क्राइम विंगचे अतिरिक्त डीसीपी केव्हीएम प्रसाद यांनी माध्यमांना सांगितले की, प्रेरणा नावाच्या महिलेने अभिनेता सिद्धार्थविरोधात तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्याविरुद्ध आयपीसी ५०९ आणि आयटी कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अभिनेत्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी सायनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातील सुरक्षेतील त्रुटींवर ट्वीट केले होते. सायनाने ट्वीट करून चिंता व्यक्त केली होती. सायना नेहवालच्या या ट्वीटवर सिद्धार्थने “*** वर्ल्ड चॅम्पियन… देवाचा आभारी आहे की, आमच्याकडे भारताचे रक्षक आहेत,” अशी आक्षेपार्ह कमेंट केली होती. यावरून नवा वाद निर्माण झाला होता.

Team Global News Marathi: