“साहेब, किती हा भाबडेपणा?” फडणवीसांचा शरद पवारांना टोला

 

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण साहजिकपणेच चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर, विरोधकांकडून जोरदार निशाणा साधला जात आहे. त्यावर, शरद पवार यांनीही विरोधकांना टोले लगावले. पवारांच्या या टिकेवर पुढे देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत प्रत्युतर दिलं आहे. तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावलं असं सांगणं म्हणजे किती हा भाबडेपणा? असा टोला फडणवीसांना लगावला होता.

महाविकास आघाडीत मंत्रीपदाचा निर्णय कसा झाला याबाबत सांगताना शरद पवारांनी त्यावेळी घडलेला किस्सा सांगितला. ज्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत पवारांना डिवचलं आहे. ‘द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्याने महाभारत घडलं आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावलं, असं सांगणं म्हणजे किती हा भाबडेपणा? साहेब! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती!’ असं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे.

‘मी ज्यावेळी सगळ्या आमदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत नेतृत्व कुणी करायचं, यासंबंधी दोन-तीन नावं आमच्याकडे आलेली होती. उद्धव ठाकरे ही बाब मान्य करायला तयार नव्हते. ते माझ्या शेजारी बसले होते. शेवटी विचारलं काय करायचं? कुणाला करायचं? उद्धव ठाकरेंचा हात मी हातात धरला आणि तो हात मी वर केला आणि सांगितलं हेच होतील. त्यांची त्या ठिकाणी हात वर करायची तयारी नव्हती, त्यांची मुख्यमंत्री व्हायची तयारी नव्हती. त्यांना अक्षरशा सक्तीने मी हात वर करायला लावला’,

Team Global News Marathi: