सगळ्यांचा सातबारा माझ्याकडे, करेक्ट कार्यक्रम करणार – जयंत पाटील

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेने उभी फूट पाडली, यामध्ये शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी करत शिंदे गट आणि भाजप युती करत सत्ता स्थापन केली.दरम्यान अनेक आमदारांना मंत्री पदाची ऑफर असल्याने तिकडे गेल्याचे बोलले जात आहे. सांगली जिल्ह्यातील अनिल बाबर यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात बंडखोरी केली.

दरम्यान सांगली जिल्ह्यातील बाबर यांच्या बंडखोरीमुळे जयंत पाटील यांनी त्यांना अप्रत्यक्ष आव्हान दिले आहे. यामुळे आगामी नगरपालिका, ग्रामपंचायत आणि जिल्ह्यापरिषदेच्या निवडणुकांमध्ये जयंत पाटील आणि अनिल बाबरयांच्यात काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातील विट्यानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात जयंत पाटील आढावा बैठक घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

ते म्हणाले कि, मंत्री – संत्री कोणी पण होऊ देत सगळ्यांचा सातबारा माझ्याकडे आहे. आपण करेक्ट कार्यक्रम करू, महाविकास आघाडीमध्ये सगळ्यांना संधी देण्यात आली आहे. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी आमदार अनिलराव बाबर यांना दिला.

माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी आज रोजी सकाळी विटा शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि विटा पालिकेतील आजी माजी नगरसेवकांची भेट घेतली. विटा अर्बन पतसंस्थेच्या सभागृहात व्यापक बैठक झाली. यावेळी विटा पालिका निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी युवा नेते माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, बाळासाहेब पाटील, विधान मतदारसंघाचे अध्यक्ष सुशांत देवकर, तालुकाध्यक्ष किसनराव जानकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते.

Team Global News Marathi: