सध्या महागाईचा प्रश्न गंभीर, तरीही काही लोक माथी भडकवत आहेत!

 

‘राज्यात सध्या जे काही चालले आहे, ते मनाला पटत नाही. राज्यासमोर आज महागाईचा प्रश्न गंभीर आहे; पण काही लोक माथी भडकवायचे काम करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे वातावरण खराब होत आहे,’ अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

पुढे शरद पवारांवर केतली चितळेने केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देताना पवार म्हणाले की, ‘खासदार शरद पवार यांनी अनेक मंत्रीपदे भूषविली; पण कधीच कमरेखाली वार केले नाहीत. कधीच आपला तोल जाऊ दिला नाही. अशा थोर नेत्यावर काही विकृत लोक खालच्या पातळीवरची टीका करतात, हे बरोबर नाही,’ असेही अजित पवार यांनी सांगितले.

‘राज्यात उसाचे विक्रमी उत्पादन झाले असून, ऊसगाळपाचे प्रमाणही वाढले आहे, ही बाब लक्षात घेऊन ऊसतोडणी वाहतुकीसाठी टनाला 200 रुपये अनुदान दिले जाईल. सांगली, कोल्हापूर भागात महापूर येऊ नये यासाठीची उपाययोजना करण्यात येत आहे. प्रमुख मार्गांवर जे पूल बांधले जाणार आहेत, त्यावर भराव टाकण्यापेक्षा कॉलम टाकून बॉक्स कन्व्हर्शन केले जाणार आहे. त्यामुळे पाणी पुढे जायला मदत होणार आहे,’ असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Team Global News Marathi: