सचिन वाझेंचे आरोप धादांत खोटे – अजित पवार

ग्लोबल न्यूज: सचिन वाझे या व्यक्तीला मी कधीही भेटलो नाही. त्याचे माझे कधी संभाषण नाही, तरी देखीलल हा माणूस माझ्यावर आरोप करतो आहे. त्याचे आरोप ऐकून मला हसूच आले. वाझे करीत असलेले सर्व आरोप धादांत खोटे असून त्याने केलेल्या आरोपाची चौकशी करुन दूध का दूध आणि पाणी का पाणी जनतेसमोर येऊ द्या. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, अशी रोखठोक भूमिका स्पष्ट करीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने अजित पवार आज पंढरपूर दौऱ्यावर होते. कल्याणराव काळे यांच्या फार्महाऊसवर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी वाझेंनी केलेल्या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

 

ज्यांना राज्यातील सरकार अस्थिर करायचे आहे त्यांचे हे उद्योग आहेत. वाझेंनी आरोप करण्यापूर्वी पुढे काय होणार? कोणाची विकेट पडणार? कसा धमाका होणार? अशी भाकीतं भाजपचे नेते करीत असतात. याचा अर्थ भाजपचेच हे कटकारस्थान आहे हे जनतेलाही कळलेले आहे. त्यांच्या या कुटनितीमुळे सरकारला कसलाही धोका होणार नाही. महाआघाडीकडे स्पष्ट बहुमत आहे. सरकारला कसलाही धोका नाही, असा निर्वाळा अजित पवार यांनी दिला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: