सचिन वाझे हे शिवसेनेचे वसुली एजंट म्हणून काम करत होते-देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

नवी दिल्ली : सचिन वाझे हे शिवसेनेचे वसुली एजंट म्हणून काम करत होते, असा खळबळजनक आरोप करत मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास हा राष्ट्रीय तपास संस्थेकडेही द्यावा. वाझे यांची केस म्हणजे फेल्यूअर आॅफ पोलिस नसून फेल्यूअर आॅफ गव्हर्मेंट असल्याचा टोला त्यांनी लगावत वाझेला वापरून घेणाऱ्या राजकीय नेत्यांवरही कारवाई करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी त्यांनी या प्रकरणी शिवसेनेवर जोरदार टीका केली.

दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सेनेवर जोरदार हल्ला केला. “शिवसेनेशी वाझे यांचे घनिष्ठ संंबंध होते. निलंबित असताना सेनेचे प्रवक्ते म्हणूनही ते वावरत होते. सेनेच्या नेत्यांसोबत त्यांनी कंपन्या स्थापन केल्या. सचिन वाझेंना महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचा बहाणा दाखवून कामावर घेतले. कोरोना काळात काही अधिकारी आजारी पडत असल्याने इतर अधिकाऱ्यांची गरज आहे, असे सांगून त्यांना परत नियुक्ती दिली.

मी मुख्यमंत्री असतानाही वाझे यांना परत कामावर घेण्यासाठी सेनेने माझ्यावर दबाव टाकला होता. मात्र मी त्यांना कामावर घेतले नाही. 2017 मध्ये वाझेंच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाले. वसई आणि विरारमधील खंडणीच्या रॅकेटमध्ये त्यांचा समावेश होता.  खराब रेकाॅर्ड असतानाही त्यांना कामावर घेतले आणि क्राईम इंटेलिजिन्स युनिट या महत्वाच्या पदाची जबाबदारी देण्यात आली.

सध्या देशभर चर्चेत असणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे नक्की कोण ?

पोलिस आयुक्तांनंतर कोणाचा वट असेल तर वाझेंचा होता. मुख्यमंत्र्यांचे ब्रिफिंग असो की गृहमंत्री अनिल देशमुख यांची बैठक असो तिथे वाझे हे नजरेस पडत होते. वसुली अधिकारी म्हणून वाझेंची नियुक्ती करण्यात आल्याचे दिसून आले.  मुंबईत डान्स बार चालविण्यासाठी पूर्ण सूट देणे, हे याचेच कारण होते,“असे फडणवीस यांनी सांगितले.

 

मनसुख यांची गाडी ही वाझेंना विकली होती. मात्र त्याचे पैसे आलेले नव्हते. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवण्याच्या एकदिवस आधी मनसुख यांनी गाडी मुलुंडला सोडली. तेथून ती गाडी वाझे यांनी घेतली. त्यानंतर मनसुख यांना गाडी चोरीला गेल्याची तक्रार नोंदविण्यास सांगितले. पोलिस ठाण्यात गाडीचोरीची तक्रार घेण्यास सुरवातीला नकार देण्यात आला. मात्र वाझेंनी संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याला फोन करून ही तक्रार घेण्यास स्वतः फोन करून सांगितले.

अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी, हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

एवढेच नाही तर मनसुख यांची चौकशी सुरवातीचे काही दिवस वाझे हेच करत होते. मनसुख यांना इतर तपास संस्था चौकशीसाठी बोलवित होत्या. त्यासाठी या तपास संस्थांच्या विरोधात तक्रार अर्ज लिहून देण्यास वाझे यांनीच आपल्या ओळखीच्या वकिलाला सांगितले. हा तक्रार अर्ज मुख्यमंत्र्यांसह इतर वरिष्ठांना पाठविण्यात आले. त्यामुळे एक व्यवस्थित कट वाझे यांनी आखल्याचे दिसून येत असल्याचे फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारचे काही हितसंंबंध जपण्यासाठी वाझे यांना येथे आणण्यात आले होते. त्याचाही उलगडा झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकऱणाचा तपास व्यवस्थित करत नाही. त्यामुळे ही पण केस राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्याची मागणी केली.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: