सभेला परवानगी नाकारली; आदित्य ठाकरेंनी केवळ तीन शब्दांत शिंदेंना सुनावले

 

:एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचा विविध भागातील ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला राज्यभरातून मोठेच खिंडार पडलेले आहे.एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा करत अनेक जिल्ह्यात पदाधिकारी, नेत्यांची नेमणुका केल्या आहेत. याशिवाय शिवसेनेप्रमाणे शिंदे गटाने युवासेनेसाठीही नेमणुका केल्या आहेत.

यातच शिंदे गटाच्या युवासेनेचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सभेला परवानगी मिळाली असून, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या मात्र सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. यावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींवर आदित्य ठाकरेंनी मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया देत शिंदे गटाला सुनावले आहे.

आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सिल्लोड येथील महावीर चौकात होणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव, खासदार श्रीकांत शिंदे यांचीही सभा होणार आहे. श्रीकांत शिंदे यांची सभा झेडपी ग्राऊंडवर होणार आहे. झेडपी ग्राऊंड आणि महावीर चौक समोरासमोरच आहे. श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे यांची सभा एकाच दिवशी होणार आहे.

या दोन्ही नेत्यांची सभा समोरासमोर होत असल्याने नगर परिषदेने आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली आहे. विशेष म्हणजे सिल्लोड नगर परिषद सत्तार यांच्या ताब्यात आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर आदित्य ठाकरेंनी तीनच शब्दांत प्रतिक्रिया देत शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सिल्लोडमधील सभेला परवानगी नाकारल्याबाबत आदित्य ठाकरेंना विचारणा करण्यात आली. यावर, डर अच्छा है, अशा तीन शब्दांत प्रतिक्रिया दिली. तसेच महिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. आधी लटके ताई, मग किशोरीताई आणि आता सुषमा ताई, पण आम्ही कोणामुळे दबून राहणार नाही, असे आदित्य यांनी ठामपणे सांगितले आहे.

Team Global News Marathi: