लंडनमधील क्वारंटाइन काळात एस. जयशंकर यांना वेटरसारखे कपडे, सुब्रमण्यम स्वामी यांचा दावा !

सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ओळखले जाणारे आणि आपल्याच पक्षाच्या नेत्यावर आणि पंतप्रधान मोदींवर रोखठोक भूमिका मांडून टीका करणारे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या नव्या दाव्यामुळे देशातील राजकारण तापताना दिसून येणार आहे. देशात कोरोना संसर्गित संख्या आणि कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. यातच भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लंडन येथे जी७ देशांच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावत भारताला मदत करणाऱ्या सर्व देशांचे आभार मानले.

मात्र भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना योग्य वागणूक दिली गेली नसल्याचा दावा केला आहे. एस. जयशंकर यांनी जी७ देशांच्या एका कार्यक्रमात सहभागी होत भारतातील कोरोनाची परिस्थिती आणि निवडणुका यांवर सविस्तर भाष्य केले होते. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या परदेश वारीबद्दल भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट करत एक दावा केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि प्रतिनिधी मंडळातील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले होते.

मला समजले आहे की, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना लंडनमध्ये क्वारंटाइन करण्यात आले असून, त्यांना वेटरसारखे कपडे देण्यात आले होते, असा दावा करत एस. जयशंकर आता मायदेशात परत येऊ शकत नाहीत. परंतु, ही बाब असत्य असल्यास खंडन करावे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. यावर आता त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: