फुटिरांची खोके आणि सत्तेची मस्ती आम्हीच उतरवू – अंबादास दानवे

राज्यात शिंदे गटाच्या बंडखोरी नंतर शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आला आहे अशातच आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा
शिंदे गटावर निशाणा साधला आहे.शिवसेनेशी गद्दारी केलेले शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना खोके आणि सत्तेतून मस्ती आली आहे. पण ही फुटिरांची खोके आणि मस्ती आम्ही उतरवू, असा खणखणीत इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दिला.

 

बुलढाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱयांचा सत्कार जिल्हा-प्रमुखांनी आयोजित केला होता. या वेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. शिंदे गटाच्या या दादागिरीला अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. कोविड काळात याच संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोविडचे जंतू टाकेन, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते याची आठवण यानिमित्ताने अंबादास दानवे यांनी करून
दिली.

शिंदे गटाचे संजय गायकवाड यांनी ‘चून चून के मारेंगे’ असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचाही अंबादास दानवे यांनी समाचार घेतला. शिवसैनिकांना शोधून मारणारा अद्याप जन्माला यायचा आहे. भ्याडपणे बोलण्यापेक्षा संजय गायकवाड यांच्यात हिंमत असेल तर समोर येऊन बोलावे. मग कळेल कोण चून चून के मारेल आणि कोण गीन गीन के मारेल, असा इशाराही या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.

Team Global News Marathi: