संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया !

 

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपशी युती हाच पर्याय असा लेख लिहिल्याने राज्याच्या राजकारणात एकचं खळबळ उडाली होती. कारण स्थापनेपासून आजपर्यंत केवळ आणि केवळ संघ-भाजप रडारवर असताना, पुरुषोत्तम खेडेकर यांनी थेट भाजपशी युती करण्याचं भाष्य केल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे.

त्यातच संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, “पुरुषोत्तम खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपकडून असा कोणताही अद्यापपर्यंत निर्णय नाही. त्यांची ऑफर काय आहे हे बघूनच हा सगळा निर्णय घेतला जाईल”

चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथे बोलताना संभाजी ब्रिगेडच्या बदलत्या भूमिकेवर भाष्य केलं. पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘मराठा मार्ग’ या मासिकाच्या संपादकीयमध्ये लेख लिहिला आहे. खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. पण आम्ही अद्याप कोणताही निर्णयापर्यंत आलेलो नाही. खेडेकरांची नेमकी ऑफर काय आहे ते पाहू. चर्चा करु, त्यानंतर याबाबतचा निर्णय घेऊ” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Team Global News Marathi: