लॉकडाऊन संदर्भात विरोधकांनी केलेल्या टीकेला रोहित पवारांचे सडेतोड उत्तर !

राज्यात नाही तर संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. आज वाढ असलेली रुग्णसंख्या केंद्राच्या अडचणीत अधिक भर घालताना दिसत आहे. त्यात राज्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १४ एप्रिल ते १ मे या पंधरा दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आले आहे, मात्र यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवेळ निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.

याच मुद्द्यवरून आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवारांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपचे नेते महाराष्ट्रातील करोनाच्या परिस्थितीवरुन राजकारण करणं थांबवत नाहीत, हे दुर्दैवी वाटतं. आज राजकारणाची वेळ नसतानाही महाराष्ट्रातील सरकार असमर्थ आहे, इथली आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली अशाप्रकारची विधानं विरोधकांकडून केली जात आहेत.

पुढे ते आपल्या पोस्टमध्ये ते लिहितात की, ही गोष्ट मात्र निश्चितच खरीय की महाराष्ट्रात रुग्ण संख्या जास्त आहे आणि रुग्णांची काही प्रमाणात गैरसोय होतेय. मात्र हे संकट रोखण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते सर्व राज्यसरकार करतंय हेही तेवढंच खरंय. राज्यात परत एकदा नाईलाजास्तव कठोर निर्बंध घालण्याची वेळ सरकारवर आली, असे रोहित पवार म्हणाले.

Team Global News Marathi: