रोहित पवारांकडून मोदींचे कौतुक, तर राज्यातील भाजपा नेत्यांना टोला

रोहित पवारांकडून मोदींचे कौतुक, तर राज्यातील भाजपा नेत्यांना टोला

ग्लोबल न्यूज: आमदार रोहित पवार हे अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करताना अनेकदा दिसून आले आहेत. तर त्यांच्या निर्णयावर टीका करताना सुद्धा रोहित पवार दिसून आले आहेत. त्यात पुन्हा एकदा रोहित पवार यांनी मोदी यांचे कौतुक केले आहे.


देशातील वाढत्या प्रभूषणाला आला घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेल्या कामाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कौतुक केले आहे. मात्र याचवेळी त्यांनी करोना वरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाही चांगलेच सुनावले आहे.

यावर रोहित पवार म्हणाले की, गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेले काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारचं कौतुक करायलाच हवं. देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही असंच काम होईल, असा विश्वास आहे.

 

तसेच करोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे जगापुढचे सर्वात मोठं आव्हान असून याविरोधात निर्णायक कृती करण्याचे आवाहन मोदीजींनी जी २० परिषदेत जागतिक नेत्यांना केल्याने आनंद वाटला असे स्पष्ट करतानाच पवार यांनी सातत्याने करोनावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या राज्यातील भाजप नेत्यांनाही सुनावले आहे .

ग्लोबल न्युज नेटवर्क: