रिया चक्रवर्ती हिचे कथित ड्रग डिलरशी बोलणे उघड
सिनेअभिनेता सुशांत सिह राजपूत प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी योग्य ती पाऊले उचललेली आहेत. यात आता खळबळजनक खुलासे होताना दिसून येत आहे. आत सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिचे जुने चाट समोर येत आहे.
रिया चक्रवर्तीच्या मोबाईलवरुन पाठवलेले व्हॉट्सअॅप मेसेज समोर आले आहेत. ज्यामध्ये रियाने एमडीएमए, गांजा अशा ड्रग्जचा उल्लेख केल्याचे दिसते. जया सहा नावाच्या व्यक्तीने रियाला “चहा किंवा पाण्यात ४ थेंब वापर आणि त्याला पिऊ दे… किक बसायला ३०-४० मिनिटे दे” असे मेसेज केले आहेत.
एका कथित चॅटमध्ये रिया ही गौरव आयरा नावाच्या संशयित ड्रग्ज विक्रेत्याशी बोलत आहे. ती म्हणते, “हार्ड ड्रग्जबद्दल बोलायचं तर मी जास्त घेतलेले नाहीत. एकदा एमडीएमए घेण्याचा प्रयत्न केला” या मेसेजनंतर “आपल्याकडे एमडी आहे का?” अशी विचारणा रियाने केली. ८ मार्च २०१७ रोजी तिने हा मेसेज केला होता