उजनीतून भीमा नदीत 20 हजार क्युसेकने पाणी सोडले
पंढरपूर – परतीच्या पावसाने उजनी जलाशयाच्या पाणलोटक्षेत्रात हजेरी लावली आहे. सोमवारी 12 आँक्टोंबला भीमानगर येथे सकाळपर्यंत 32 मि.मी. पावसाची नोंद होती. दरम्यान उजनी प्रकल्प 110 टक्के भरला असल्याने येथे पाणी साठविण्याची क्षमता संपल्याने 20 हजार क्युसेकने पाणी रविवारी रात्रीपासूनच भीमा नदीत सोडले जात आहे.
वीजनिर्मितीसाठी 1600 क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याने नदीत 21600 क्युसेक पाणी येत आहे.
उजनी धरणाचे 16 दरवाजे 0.35 मीटरने उघडण्यात आले आहेत. दरम्यान लागोपाठ दुसर्या दिवशी भीमा जलाशयावर पावसाची नोंद आहे. याचबरोबर जलाशयाकाठी विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान या पावसाळा हंगामात उजनी जलाशयावर 796 मि.मी. एकूण पावसाची नोंद आहे.
राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसणार; हवामान खात्याचा अंदाज
दरम्यान रात्री उजनीत येणारी दौंडची आवक 13 हजार क्युसेक पेक्षा जास्त होती. यामुळे रात्रीपासून पाणी सोडण्यात येत आहे.
Outflow :-
1) Sina Madha LIS – 259 cusecs.
2) Dahigaon LIS – 105 Cusecs.
3) Tunnel – 1000 cusecs.
4) Main Canal – 2450 Cusecs.
5) Power House – 1600 Cusecs.
6) Spillway — 20000 Cusecs.
Total River —- 21600 Cusecs
वजन वाढू द्यायचं नाही ना ? मग रात्रीच्या जेवणात हे बदल आवर्जून करा
Spillway Gate Position :-
1) Total Gates —- 41 Nos.
2) Gates Opened — 16 gates opened by 0.35 m