बार्शी: उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाल्यामुळे धरण अवघ्या बारा तासात दोन टक्के वधारले आहे. काल शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता उजनी प्रकल्प 92 टक्के होता तर शनिवारी 2 ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजता हा प्रकल्प उपयुक्त पाणी पातळीत 94.30 टक्के इतका भरलेला आहे.
दरम्यान रात्री मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद उजनी जलाशय परिसरात नोंदली गेली आहे यात पळसदेव ते शंभर मिलिमीटर निमगाव केतकी ते 79 याचबरोबर भिगवण येथे 91 मिलिमीटर पावसाची नोंद आहे. याच बरोबर माढा व करमाळा जलाशय काठच्या भागातही पावसाची नोंद आहे. उजनी धरणावर 12 मिलिमीटर पाऊस झाला असून या पावसाळी हंगामात 465 मिलिमीटर पावसाची नोंद येथे आहे दरम्यान जलाशय काठी झालेल्या पावसामुळे उजनी धरण चांगल्या पद्धतीने वधारले आहे .
जलाशयात एकूण पाणीसाठा 114.18 टीएमसी इतका झाला असून यातील उपयुक्त पाणी साठा हा 50.52 TMC आहे आता धोरणाची वाटचाल ही टक्केवारीच्या शंभरीकडे सुरू आहे दरम्यान दौंड जवळून उजनीत मिसळणारी पाण्याची आवक किती 3917 क्यूसेक आहे.