महाराष्ट्र व गुजरातला परतीचा पाऊस झोडपणार, आज, उद्या मुसळधार कोसळणार; शास्त्रज्ञाचा इशारा –

नांदेड : महाराष्ट्रासह गुजरातला परतीचा पाऊस झोडपून काढणार आहे. हा पाऊस जाता जाता एखादा तडाखा देण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाचे वैज्ञानिक कृष्णानंद होसळीकर यांनी हा इशारा ट्विटरवर दिला.गेले दोन दिवस झाले राज्यांच्या सर्वच भागात पाऊस कोसळत आहे. यावरून परतीचा पाऊस झोडपणारच अशी चिन्हे दिसत आहेत. नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

बंगालच्या उपसागरात 24 सप्टेंबर रोजी ‘गुल – आब’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. त्यानंतर ते आंध्र प्रदेशात रविवारी दुपारी तीन वाजता धडकले. परिणामी, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर तुफान पाऊस सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

कृष्णानंद होसळीकर यांच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात चक्रवाट वावटळ तयार होणार आहे. बंगालच्या खाडीत प्रभावाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते ओडीसा आणि आंध्र प्रदेशच्या समुद्र तटांवर धडक मारणार आहे. याचा प्रभाव मुंबई, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात दिसणार आहे. अत्यंत जास्त वेगाने वारे वाहणार आहेत. हा प्रभाव २७ आणि २८ सप्टेंबर रोजी जास्त दिसणार आहेत. यासाठी समुद्रकाठी राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन  हवामान विभागाने केले आहे.

 

आज मुसळधार पावसाचा अंदाज ..

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार २७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोलीसह एकूण ११ जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. सोमवारी राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील रायगड, ठाणे, पालघर, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पुणे, नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांना औरेंज अलर्ट घोषित केला आहे.आज नांदेड जिल्ह्यात दुपारनंतर  पावसाने रौद्ररूप धारण केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: