रेटून खोटे बोलण्याची भाजपची सवय, अमर रोहित पवारांनी लगावला टोला |

 

सध्या इंधन दरवाढीच्या मुद्दयांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. त्यातच इंधनदरवाढीच्या मुद्दयावरून देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याचा आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

खोटे बोलायचे आणि रेटून बोलायचे ही भाजप नेत्यांची जुनी सवय. मात्र महाराष्ट्रातील जनता ही चलाखी खपून घेणार नाही, अशी टीका रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर केली आहे. राज्यातील भाजपचे नेते व केंद्र सरकार यांच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीवर पवार सध्या प्रखरपणे टीका करताना दिसून येत आहेत. त्यांच्या ट्विटर हँडलवर रोज भाजपवर चुकीच्या गोष्टींवर हल्लाबोल केला जात असल्याचे दिसून येते.

तसेच आजही त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या खोटं बोलण्याच्या गोष्टीचा पर्दाफाश केला आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल वरील करापोटी बारा रुपये देत असल्याचे सांगितले होते,मात्र फडणवीस हे कसे खोटे बोलत आहेत हे पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून उघड केले आहे.

भाजपचे नेते खोटं बोलतात आणि तेही रेटून बोलतात ही त्यांची जुनी सवय. पेट्रोलवर लावण्यात येणारे करातील साडेतीन पैसे केंद्राकडून राज्याला मिळत असताना बारा रुपये दिले जात असल्याचे हास्यास्पद विधान या ज्येष्ठ नेत्यांनी केले. मात्र ही चलाखी देशात कुठेही चालेल पण महाराष्ट्रात नाही व साडेतीन पैसे मिळत असताना यांना बारा रुपये कसे दिसले? बहुतेक अधिवेशनापासून यांना बाराचा आकडा दिसत आहे,अशी टीका पवार यांनी केली.

 

Team Global News Marathi: