सीरमच्या आदर पुनावाला यांनी टोचून घेतली लस, कोविशील्ड सुरक्षित असल्याचा दिला संदेश
सिरम इन्स्टिट्यूट निर्मित कोविशील्ड या कोरोना प्रतिबंधक लसीला देशभरात आज पासून सुरवात झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाल्यानंतर देशभरातील ठिकठिकाणी लसीकरणाला सुरवात झालेली आहे.
मागील काही महिन्यांपासून अविरत मेहनत व संशोधन करून ‘कोविशिल्ड’ या लसीद्वारे जगाला कोरोना संकटावर मात करण्यासाठी आशेचा किरण दाखविलेल्या ‘सिरम’ इन्स्टिटयूटच्या आज सुरु झालेल्या लसीकरण मोहिमेद्वारे ध्येयपूर्ती झाली आहे. याचवेळी लस सुरक्षित असल्याचा महत्वपूर्ण संदेश देत सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक अदर पूनावाला यांनी स्वतः ‘कोविशील्ड’ लस टोचून घेतली आहे. ही माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.
#WATCH | Pune: Serum Institute of India CEO Adar Poonawalla receives a shot of #COVISHIELD vaccine manufactured by his company.
(Video credit – Poonawalla's Twitter account) pic.twitter.com/grC4uKc804
— ANI (@ANI) January 16, 2021
लसीकरण मोहीमेबद्दल मी संपूर्ण देशाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. जगातील सर्वात मोठी यशस्वी लसीकरण मोहीम भारतात पार पडत आहे. कोव्हीशिल्डच्या यशामागे अनेकांचे परिश्रम आहेत. या यशाचा मला अभिमान वाटतो. लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे, हा संदेश आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी लसीकरण करून घेत आहे, अशा आशयाचे ट्विट अदर पुनावाला यांनी केले आहे.