प्रदेशाध्यक्षपद सोडण्याबद्दल नाना पटोलेंचं मोठं विधान वाचा सविस्तर वृत्त

 

मुंबई | कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. कधी टी शविसेन्व्हर टीका करताना दिसतात तर कधी राष्ट्रवादीवर टीका करताना दिसून आले आहेत. अशातच रविवारी सकाळीच त्यांनी अधिवेशनाच्या मुदतीवरून महाविकास आघाडी सरकारला घरचा अहेर दिला. आता ‘मला 3 वर्षांच्यावर प्रदेशाध्यक्षपदावर राहायचं नाही’ असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. नाना पटोले बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.

आज खामगावमध्ये पत्रकारांशी बोलत असताना नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या वादावर आपली भूमिका मांडली आहे. ‘काँग्रेसमध्ये तुमच्याविरोधात तक्रारी केल्या जात आहे, काँग्रेस हायकमांडकडेही तुमच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी नाना पटोले यांना विचारला होता. यावर नाना पटोले म्हणाले की, ‘कुणीही १० ते १२ वर्ष कोणतेही पद भोगण्यासाठी येत नाही.

मलाही ३ वर्षाच्यावर प्रदेशाध्यक्ष पदावर राहायचं नाही. जोपर्यंत म्हणजेच २०२४ पर्यंत काँगेस हा मोठा पक्ष होणार आहे, त्या परीने माझे काम सुरू आहे. आम्ही सर्व मिळून काम करत आहोत आणि कुणाच्या भावना असतात, त्यांच्या भावनांना विरोध करण्याची गरज नाही’ असं नाना पटोले म्हणाले. दरम्यान, विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे.

कोरोना संकटामुळे महाविकास आघाडी सरकारने हे अधिवेशन केवळ पाच दिवसांसाठी घेतलं आहे. त्यामुळे विरोधी पक्षाकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. कमी दिवसांचं अधिवेशन घेऊन सरकार राज्यातील प्रश्न सोडू इच्छित नाही, असा आरोप भाजपने केल्यानंतर, आज सकाळी बुलडाणा जिल्ह्यात नाना पटोले यांनी स्वतःच्याच महाविकास आघाडी सरकारला घरचा अहेर दिला आहे. माझी आजही तीच भूमिका आहे. पण विरोधक या पद्धतीचा आरोप करत असतील तर हा थोतांड आहे. खरंतर विरोधकांनी गेल्या पाच वर्षात जे पाप केलं ते काढायची संधी सत्ता पक्षाच्या आमदारांना मिळाली पाहिजे. ही भूमिका आमची आहे.

Team Global News Marathi: