रिलायन्स ग्रुप फॉर्मात : रिलायन्स रीटेलला मिळाला सातवा गुंतवणूकदार, तब्बल ५५१२.५० कोटींची गुंतवणूक

मुंबई: भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी (
यांच्या रिलायन्स रीटेल व्हेंचर्स लिमिटेडवर (आरआरव्हीएल) गुंतवणूकदारांची मोठीच कृपा होत आहे. अबूधाबी गुंतवणूक प्राधिकरणाने मंगळवारी १.२०%च्या इक्विटीसाठी ५,५१२ कोटीच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.आरआरव्हीएलमध्ये हा आठवा गुंतवणुकीचा प्रस्ताव आहे. एडीआयएची गुंतवणूक आरआरव्हीएलच्या ४.२८५ लाख कोटी रुपयांच्या प्री-मनी इक्विटी मूल्यावर झाली आहे.

एडीआयएच्या गुंतवणुकीसोबतच आरआरव्हीएलमध्ये एका महिन्यात सात गुंतवणूकदारांकडून आठ गुंतवणुकीच्या प्रस्तावांद्वारे ८.४८%साठी ३७,७१० कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. आरआरव्हीएलच्या वैश्विक गुंतवणूकदारांमध्ये सिल्व्हर लेक, केकेआर, जनरल अटलांटिक, मुबाडला, जीआयसी आणि टीजीपी यांचा समावेश आहे. सिल्व्हर लेकचे दोन गुंतवणूक प्रस्ताव आहेत.

अबूधाबी गुंतवणूक प्राधिकरणाची मोठी गुंतवणूक

रिलायन्स इंडस्ट्रीजचे लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी एडीआयएच्या गुंतवणुकीबाबत म्हटले आहे, ‘आम्ही अबुधाबीच्या कंपनीच्या सध्याच्या गुंतवणुकीबद्दल आणि सातत्याने मिळणाऱ्या सहकार्याबद्दल समाधानी आहोत आणि त्यांच्या चार दशकांच्या मजबूत वैश्विक ट्रॅक रेकॉर्डचा आरआरव्हीएलला लाभ होईल अशी आशा करतो. एडीआयएची ही गुंतवणूक रिलायन्स इंडस्ट्रीजची सुदृढता आणि सद्भावनेसह व्यवसायाच्या क्षेत्रात समग्र बदल होण्याची दर्शक आहे.

’ एडीआयएचे कार्यकारी निदेशक हमाद शाहवान अल्दहाहेरी यांनी म्हटले आहे की आरआरव्हीएल भारताच्या बाजारात वेगाने आणि चांगले स्थान निर्माण करत उभा राहिला आहे आणि भौतिक आणि डिजिटल आपूर्तीच्या शृंखलेत मजबूत स्थान निर्माण केले आहे. कंपनीने संभावित वाढीच्या मार्गावर मजबूतीने पाऊल ठेवले आहे.

रिलायन्स रीटेल भारतातील झपाट्याने वाढणारा रीटेल उद्योग

रिलायन्स रीटेल लिमिटेडच्या देशभरात पसरलेल्या १२ हजारपेक्षाही अधिक स्टोअर्समध्ये दरवर्षी साधारण ६४ कोटी खरेदीदार येतात. हा भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात वेगाने वाढणारा रीटेल कारभार आहे. रिलायन्स रीटेलकडे भारतातील सर्वात फायदेशीर रीटेल बिझनेसचा शिरपेचही आहे. कंपनी रीटेल वैश्विक आणि स्थानिक कंपन्या, छोटे उद्योग, रीटेल व्यापारी आणि शेतकऱ्यांचे एक असे तंत्र विकसित करू इच्छिते ज्यामुळे उपभोक्त्यांना परवडणाऱ्या किंमतीत सेवा प्रदान करता येईल आणि लाखोंची रोजगारनिर्मिती केली जाऊ शकेल.

रिलायन्स रीटेलने आपल्या नव्या वाणिज्य रणनीतीनुसार छोट्या आणि असंघटित व्यापाऱ्यांचे डिजिटलीकरण करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीचे लक्ष्य २ कोटी व्यापाऱ्यांना या नेटवर्कशी जोडण्याचे आहे. हे नेटवर्क व्यापाऱ्यांना चांगल्या तंत्रज्ञानासह ग्राहकांना चांगल्या किंमतीत सेवा देण्यास मदत करेल. आरव्हीएलने नुकताच या क्षेत्रात तीन दशकांपेक्षा अधिक काळ घालवलेला फ्यूचर समूह २४,७१३ कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता.

साभार टाइम्स नाऊ

ग्लोबल न्युज नेटवर्क: