वीजबिल संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट…!

वीजबिल संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट…!

कोरोना संकटात अनेकांवर आर्थिक संकट ओढवलेले असताना त्यात भरमसाठ विजबिलाने सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले होते. त्यात अनेक राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरून जादा वीज बिलाचा विरोध केला होता. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोशारी यांची राजभवनात भेट घेतली.

राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली. मात्र, ही भेट कशाबद्दल आहे. ते सांगितले नव्हते. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राज्य ठाकरे यांनी लोकांचे अनेक प्रश्न असल्याचे बोलून दाखविले. आज रेल्वे सगळ्यांसाठी सुरु नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. लोकांचे प्रश्न सुटलेले नाही. वीज बिलाचा प्रश्न कायम आहे. लोकांची  बिले कमी झालेली नाहीत. हे सरकार कुंथत कुंथत चालत आहे. सरकारचे धरसोड धोरण आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

राज ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत अनेक प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी राज ठाकरे वाढीव वीज बिलासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. लॉकडाऊनच्या काळात आपली व्यथा मांडण्यासाठी अनेक संघटनांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यातील अनेक मुद्दे राज ठाकरे राज्यपालांसमोर मांडले. त्याबाबत एक निवेदनही राज ठाकरे यांनी दिले आहे. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव अमित ठाकरेदेखील उपस्थित होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: