पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर्स 50 टक्केच कार्यक्षम – डॉ श्रीकांत शिंदे

ठाणे : राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर पाठवण्यात आले होते. मात्र केंद्राकडून पाठ्वण्यात आलेले व्हेंटिलेटर 50 टक्केच कार्यक्षम असल्याचे विधान शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून चौकशी केली जावी, अशी मागणीही श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये नवा वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान केयर फंडातून वाटप करण्यात आलेले व्हेंटिलेटर्स ५० टक्के क्षमतेनेच चालतात, असा निष्कर्ष डॉक्टरांच्या चर्चेतून पुढे आला आहे. ही बाब खरी असेल तर रुग्णांच्या जीवितास धोका आहे. हे व्हेंटीलेटर १०० टक्के क्षमेतने चालणारे हवेत. ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य खात्याच्या निदर्शनास आणून दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना दिले आहे.

सदर बाब ठाणे जिल्ह्यातील डॉक्टरांच्या माध्यमातून उघड झाली आहे. केवळ ठाणे जिल्ह्यात 50 टक्के क्षमतेनुसार चालणारे व्हेटींलेटर प्राप्त झाले आहे की, संपूर्ण राज्यात आणि देशात अशा प्रकारच्या व्हेटींलेटरचा पुरवठा केला गेला आहे, याची चौकशी केली जावी असे शिंदे यांनी मागणी केली आहे. ज्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. नेमके किती व्हेंटिलेटर्स पंतप्रधान निधीतून पुरविले गेले आहेत, याची माहिती प्रशासनाकडून उपलब्ध होऊ शकते असेही शिंदे यांनी सांगितले.

Team Global News Marathi: