रयत शिक्षण संस्थेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल एवढ्या कोटींची मदत

ग्लोबल न्यूज: कोविड-१९ या जागतिक महामारीमुळे ओढवलेल्या अभुतपूर्व संकटाचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या आवाहनाला अनुसरून रयत शिक्षण संस्था, सातारा या संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी त्यांचे एक दिवासाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी करीता देणगी म्हणून द्यावयाचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

यावेळी पवारांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, रयत शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या माहे मे, २०२० च्या वेतनातील एक दिवस वेतनाची जमा रक्कम रू.२,७५,९२,८२१ (अक्षरी रू. दोन कोटी पंच्च्याहत्तर लाख ब्याण्णव हजार आठशे एकवीस फक्त ) संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपणाकडे सुपूर्द करीत आहे. कृपया उक्त रकमेचा धनादेश क्र. ०३६८८८, दि.०५.११.२०२० स्विकृत व्हावा.

दिपावलीच्या शुभेच्छेसह!

ग्लोबल न्युज नेटवर्क: