रवी राणा यांनी न्यायालयासमोर जमानत नाकारली, शेतकऱ्यांसाठी आमदार राणाची दिवाळी कारागृहात

रवी राणा यांनी न्यायालयासमोर जमानत नाकारली, शेतकऱ्यांसाठी आमदार राणाची दिवाळी कारागृहात

अमरावती :- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी व वीज बिल माफ व्हावे या मागणीसाठी आमदार रवी राणा यांनी मोझरी येथे रस्ता रोको आंदोलन केले होते, त्यानंतर त्यांना तिवसा पोलीस ठाणे अंतर्गत अटक करण्यात आली, रात्री बारा वाजता सर्व शेतकऱ्यांसमवेत त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले व त्यावर रात्री 2 वाजे पर्यंत न्यायालयीन कारवाही चालली.

मात्र आमदार रवी राणा यांनी न्यायालयासमोर आपली जमानत नाकारली शेतकऱ्यांना कोणतीच मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात होत असेल तर मी सुद्धा माझी दिवाळी अंधारात कारागृह करेल,जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाग येणार नाही तोपर्यंत माझे आंदोलन सुरूच राहील असे यावेळी आमदार रवी राणा यांनी सांगितले.

आमदार रवी राणा यांना जेव्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते तेव्हा पोलिसांचा तगडा बंदोबस्त जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर लावण्यात आलेला होता,आमदार रवी राणा हे न्यायालयात दाखल होतात न्यायालयाच्या गेटवर त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत सरकारचा तीव्र शब्दात विरोध केला.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: