राष्ट्रध्वज कसा फडकावायचा हे मला शिकवू नका; मोदींना सुनावले खडेबोल

 

नवी दिल्ल्ली | मी लहानपणापासूनच राष्ट्रध्वज फडकवत आहे. त्यासाठी कोणतीही चिथावणी देण्याची गरज नाही. मी माझ्या इच्छेनुसार ध्वज फडकवीन. भारतीय जनता पक्ष आम्हाला काय शिकवणार? तिरंगा कसा फडकावायचा हे तुम्ही मला शिकवण्याची गरज नाही. असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पश्चिम बंगालच्या बेहाला येथे एका कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या.

यावेळी ममता बॅनर्जी यांनी अनुब्रता मंडल यांच्या सीबीआयने केलेल्या अटकेवर प्रश्न उपस्थित केला. तुम्ही पुराव्याशिवाय एखाद्या व्यक्तीवर आरोप कसे करू शकता. बॅनर्जी यांनी दावा केला की, भाजप देशात बिगर एनडीएच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप आपल्याला घाबरत आहे, त्यामुळेच ते आपली प्रतिमा डागाळत आहेत.

ममता बॅनर्जी यांनी देशवासियांना देशाशी जोडण्याचे मार्ग सांगण्याचे आवाहन केले. त्यांनी रविवारी ट्विट केले की, ‘आम्ही, भारताचे लोक. आपली संस्कृती, परंपरा, भाषा, कपडे, चालीरीती वेगवेगळ्या आहेत. तरीही, आम्ही एक आहोत. राष्ट्रावरील आपले प्रेम आपल्याला बांधून ठेवते. हिंदुस्थानशी असलेला आपले पवित्र नटे आपल्याला एकत्र करते.

Team Global News Marathi: