राष्ट्रवादीला मोठा धक्का | या बड्या नेत्याची पक्षाला दिली सोडचिट्टी

 

गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडी सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ॲड. मजीद मेमन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. ‘वैयक्तिक कारणामुळे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मागील १६ वर्षे आपणास राष्ट्रवादीत मानसन्मान मिळाला. यापुढे शरद पवार यांच्यासोबत आपल्या शुभेच्छा राहतील’, असे मेमन यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी दिवसाचे २० तास काम करतात. हे त्यांचे विलक्षण गुण आहेत. टीका करण्यापेक्षा त्यांचे कौतुक केले पाहिजे’, असेही मेमन यांनी म्हटले होते.मेमन यांनी यांनी पंतप्रधानांचे कौतुक केल्यानंतर ते भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या सोडचिट्टीमुळे पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा विचार करावा’, असा सल्ला काही दिवसांपूर्वी ॲड. मेमन यांनी दिला होता. ‘निवडणुकीत मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम यंत्रात फेरफार करण्यात आल्याच्या विरोधकांच्या आरोपात काहीच तथ्य नाही. पंतप्रधान मोदी दिवसाचे २० तास काम करतात. हे त्यांचे विलक्षण गुण आहेत. टीका करण्यापेक्षा त्यांचे कौतुक केले पाहिजे’, असेही मेमन यांनी म्हटले होते.

Team Global News Marathi: