रश्मी शुक्ला भारतीय जनता पक्षाच्या एजंट, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची टीका

मुंबई : गुप्तचर विभागाच्या आयुक्तांना पोलीस दलात बदल्यांसाठी रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यासाठी थेट अधिकाऱ्यांशी बोलणी सुरु होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालकांना ही माहिती दिली होती अशी माहिती आज मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावत रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. रश्मी शुक्ला या भारतीय जनता पक्षाच्या एजंट आहेत असा आरोप मलिक यांनी केला होता.

पुढे बोलताना मलिक म्हणाले की, २०१९ मध्ये सत्तास्थापनेच्या नाट्यावेळी भाजपच्या विरोधात असणाऱ्या राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले होते, असा आरोपच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

तसेच देवेंद्र फडणवीस यांनी लागलेले सर्व आरोप फेटाळले होते. त्यांना लोकांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्याची सवय लागली होती. त्यामुळेच आघाडी सरकारने शिक्षा म्हणून त्यांना थेट बढती न देता त्यांच्यासाठी वेगळ्या पदाची निर्मिती केली, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

Team Global News Marathi: