रशिया-युक्रेन युद्धाबाबत राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची मोठी घोषणा

 

रशिया-युक्रेन युद्धाचा आज 131 वा दिवस असून एक एक करुन रशिया युक्रेनचे प्रांत जिंकत आहे तर दुसरीकडे युक्रेन त्यांना तगडी लढत देत रशियाने आपले जिंकलेले प्रांत परत मिळविण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे त्यात आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन मोठी घोषणा केली आहे.

पुतिन यांनी रशियाने पूर्व युक्रेनमधील लुहांस्क प्रांत जिंकल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी पश्चिम देशांकडून मिळालेल्या हत्यारांमुळे आम्ही रशियाने आमच्य़ा बळकावलेल्या प्रांतापैकी एक एक तुकडा परत मिळवू असे सांगितले आहे. सुरुवातीच्या काळात युक्रेनवर विजय मिळविणे रशियासाठी फार सोप्पे असल्याचे बोलले जात होते. नाटोनेसुद्धा तसेच सांगितले होते. परंतु आता सहा महिने उलटुनही युक्रेन हार मानायला तयार नाही.

सुरुवातीच्या काळात रशियाचे सैनिक युक्रेनच्या राजधानी कीवपर्यंत पोहोचले होते. परंतु रशियाला अजून हवी तशी सफलता मिळाली नाही. रशियन सैन्य सतत हल्ले करुन छोटी – मोठी शहरे काबिज करत आहेत. शहरांच्या नुकसानामुळे युक्रेनला मागे हटावे लागत आहे. युक्रेनचे गव्हर्नर सेरेही गैदाई यांनी अजून आम्ही युद्ध हरलो नाही, असे सांगितले आहे.

 

Team Global News Marathi: