बलात्कार आणि वासना ….!

बलात्कार आणि वासना ….!

आजकल वर्तमान पत्राच्या पहिल्या दुसऱ्या पानावर आपल्याला बलात्काराच्या बातम्या वाचायला मिळतात. एवढेच काय तर सोशल मीडियावर तीन-चार बातम्या बलात्कार, लैगिक शोषण अशा महिला अत्याचाराच्या बातम्या वाचायला मिळतात. पण या घटना का घडतात आणि यावर तोडगा काय ? असा प्रश्न आज नाही तर अनेक दिवसांपासून मला पडला होता.

यावर अनकेजण विचार करत असतीलच, पण बलात्कारी व्यक्तीला अत्याचार करताना त्या स्त्री जातीच्या डोळ्यात जन्म देणारी आई, हातावर राखी बांधणारी बहीण, बापाचं सुख देणारी लेक आणि म्हतारपणी आधार देणारी बायको आठवत नसेल का? नाही कारण त्यावेळी आपल्या वासनेच्या आहारी तो बळी पडतो असे काहीजण म्हणतात.

पण वासना म्हणजे काय ? तर आपली गरज भावण्यासाठी स्त्रीच्या मानविरोधात जाऊन तिच्यावर जबरदस्ती (संभोग) करणं म्हणजे वासना ! पण आजची माणसं स्वतःला हे कृत्य करण्यापासून रोखू शकत नाही का ? मग बलात्कार करणारा आपल्या आई, बहिणीकडे का? या वासनेच्या नजरेने बघत नाही हीच नजर का ? समाजात वावरणाऱ्या इतर स्त्रियांच्या बाबतीत त्याच्याकडून चूक (माफ करा चुक नाही पाप) घडत असेल.

आजचा व्यक्ती वासनेच्या आहारी जाऊन हे कृत्य करतो. असे काहींचे मत, मग वासनेला रोखण्यासाठी ते पाप करण्यापेक्षा आत्महत्या का? करत नाही, का हे कृत्य आपल्या घरच्या स्त्रीवर करत नाही ही गरज भागवायला रक्ताची नाती का शोधत नाही. मुळात त्या व्यक्तीला स्त्रियांचा आदर राखण्याचे संस्कार त्या व्यक्तीला आई-वडिलांकडून मिळाले नसेल हेच मुख्य कारण असू शकते. नाहीतर हे कृत्य करताना तो १० वेळा विचार करेल.

यावेळी मराठी अभिनेता सुबोध भावे यांचे वाचनात आलेले वाक्य आठवले “आजचा पुरुष वर्ग का आपल्या इंचभर अवयवावर इतक्या उड्या मारत असतो” आणि हीच आजची सत्य परस्थिती आहे. म्हणूनच आज वासनेच्या डोळ्यांनी समाजात वावरताना त्या डोळ्यसमोर आपल्या घरी असणाऱ्या आई-बहिणीच्या इज्जतीचा विचार करावा आणि या समाजात वासनाधारी व्यक्तीने वावरले पाहिजे तरच समाजात बलात्कार रोखता येऊ शकतात.

ग्लोबल न्युज नेटवर्क: