राणे म्हणजे राज्याला लागलेली पनवती, पुन्हा खासदार विनायक राऊत यांनी साधला निशाणा

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या विधानावरून शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून शिवसेनेने बँनरबाजी करून नारायण राणेंवर निशाणा साधला आहे.त्यातच आता शिवसैनिक आक्रमक झाले असून पुणे, नाशिक, महाड आणि संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच लवकरच राणे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात येणार आहे.

त्यातच आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका करत पनवती असा उल्लेख केला आहे. नारायण राणेंना मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधानांना लिहिले आहे. राणेंना पक्षात घेऊन भाजपने भुताच्या हातात कोलित दिल्याचा आरोपही विनायक राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आता एकीकडे शिवसेना-राणे वाद पेटलेला असताना या वादात आता राऊत यांनी उडी घेतली आहे.

तसेच विनायक राऊत यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी नारायण राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. ‘राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केले आहे. यामुळे मुख्यमंत्री पदाचा अपमान झाला. राणे म्हणजे राज्याला लागलेली पनवती आहे. भाजपनं भुताच्या हातात कोलित दिल आहे. याचा भाजपला पश्चात्ताप झाला असेल.’ असं राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: